Sunday 19 April 2015

तंत्रस्नेही शिक्षक सहविचारसभा दि.१८/0४/२०१५

तंत्रस्नेही प्रशिक्षणाचा प्रारंभ
१)प्रास्ताविक=  सर्वांची उपस्थितीपत्रके भरुन सुरुवात प्रास्ताविकामध्ये मा.नंदकुमारसाहेब यांचे प्रेरणादायी भाषण त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी येत्या पाच वर्षात सर्व शाळा डिजीटल करण्याचे धोरण सांगीतले.विनोदी शैलीमध्ये संदीप गुंड,बालाजी जाधव,भाऊसाहेब चासकर,प्रशांत कर्‍हाडे,राम सालगुडे यांचा गौरव केला  असेल तर देतील आधी कमवल तर असेल व असेल तर देता येईल ही विधाने विचार करायला लावणारी होती.स्वतः ग्रुपमध्ये कसे आले ग्रुप निकष सर्व अॅडमिन डेमोक्रोसीने ग्रुप कसा विकसित झाला.आपणास ७लाख२५हजार शिक्षकांना Teach savvyबनवायचे आहे.सुरेश भारती सरांचे,राजेंद्र जाधव सरांचा उल्लेख केला.राज्य पातळीवर गाईड करणेसाठीscertकडुन १२लोकांची टीम असेल सर्व शाळा ई लर्निंग व सर्व शिक्षक Teach savvyबनविणेपर्यंत काम करतील.विविध पाच कंपण्यांचे एक्सफर्ट शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापराबाबत साधने बनवत आहेत.आपणास १००% वापरकर्ते निर्माण करावयाचे आहे.Teach savvy म्हणजे टेक्नोलाॅजीवर प्रेम करणारा ती एन्जाॅय करणारा असे सांगीतले.टेक फोबिक म्हणजे टेक्नाॅलाॅजीस घाबरणारे असे टेक फोबिक दुर करायचे आहेत हा हेतु मांडला.शिक्षकांचा वेळ शाळेत जावा यासाठी २मिनिटांत माहिती देता येईल असे तंत्र विकसित करणे चालु आहे.प्रशासन वर्गाध्यापन या दोन प्रकारची तंत्रसाधने विकसित होत आहेत.महाराष्ट्रातीलसर्व शाळा ई शाळा बनविणे उदिष्टे मांडली.यासाठी त्यांनी संदिप गुंडसर यांस गुंडशाळा म्हणजे डिजीटल शाळा.या विधानातुन गुंडसर ७जिल्ह्यात ई लर्निंगवर मार्गदर्शन करत आहेत सांगीतले त्यांचा गौरव केला.शिक्षक रजेवरुन आले तरी रजा मंजुर नसते ह्यासाठी गुणवत्ता सुधारणे व प्रशासन सुधारणे यासाठी काम करत आहेत.कंपन्या pwc,selchar,apmg,honestium bmy,diloy it कंपन्या लक्ष घालत आहेत.गुगलबाबाकडुन शिकणारे सर्व बालाजींची ८दिवस थांबु सर्व पुस्तके डिजीटल करण्याची बालचित्रवाणीची मदत घेण्याची  योजना मांडली.   जरगसाहेब, सैगलमॅडमचे प्रतिभा भराडे मॅडम विडिओआहेत सर्व  मुले शिकतात.वेबसाईट बनविली तर लोक किती बघतील का?खडुफळापेट्या चावी हरवली म्हणुन न उघडणारेा वेब का उघडतील शाळेचे विडिओ upload करा सांगुन ATFसदस्याकडे एक वर्ग दिला ४९पैकी १७ला काही न येणारे होते पण ४वर्षात आले नाही ते चार महिन्यात पुर्ण केले.४महिन्यात मुले शिकली ती चार वर्षात का शिकली नाहीत? हा विचारात पाडणारा प्रश्न होता. mkclकंपनी सर्वासाठी प्रशिक्षण घटक बनवतील ई लर्निंग घरी करुन आॅनलाईन परीक्षा प्रमाणपत्र यावर बोलले.तेजलला मोटिवेशन बददल बोलाव कसे ते मुद्दे मांडले चौथ्या वेतन आयोगाने तलाठ्यापुढे पगार गेले.१००वाढवले तर राज्यावर 7 कोटी बोझा पडतो.जादाने २०हजार कोटी जे अशक्य वाटतो.नाचायची वेळ झाली .जनावरे १दिवसात चालायला शिकते आपले ३६५लावतो.४पायाचा दोन पायावर चालु लागला आता मेंदुवर चालायला हवा.डोक्याने चालायला हवे.रोमन गणितज्ज्ञाचे भागाकाराचे उदा. दिले आता आपण विचार  करायला हवा.गुणवत्तेबाबत सर बोलले व मी आज शिकणार आहे हे मत मांडले.व प्रास्ताविक संपविले .

जालना जिल्हा परिषदेत काम करणारे बालजगत डाॅट काॅमने अवकाशनिरिक्षणमुळे प्रसिध्द मायक्रोसाॅफ्टचे पुरस्कार विजेते अनिल सोनुनेसर यांनी तंत्रस्नेही शिक्षकांचे गट गटाची व कार्ये याबाबत मार्गदर्शन pptच्या सहाय्याने केले त्यांनी सांगीतलेली गटाची रचना व कार्ये अशी
प्रोत्साहन
 हा गट शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करेल.
 शिक्षकासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करणे.
 त्यांना संगणकाच्या मदतीने गुणवत्ता कशी वाढवता येते ते उदा. सहीत समजावून सांगणे.
 त्याच्या उदाहरणे निवडताना ती उदाहरणे ही आपल्या परीसरातील , शाळेतील असावी असे वाटते.
 शिक्षकांसाठीच्या कार्यशाळांचे नियोजन हा गट करेल व त्या त्या परीसरातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने प्रोत्साहनपर कार्यक्रम राबवितील. 
 शिक्षकांच्या मधीन संगणकाबददलची भिती दूर करण्याचे कार्य हे या गटाचे मुख्य कार्य राहील.
 
शिक्षक गुणवत्ता
 शिक्षक गुणवत्ता हा गट शिक्षकांचे सबलीकरण या विषयावर भर देईल.
 या विषयी शिक्षकांना विविध संगणक विषयी मार्गदर्शन हा गट करेल.
 ICT च्या साहयाने वर्ग अध्यापनाचे कार्य करण्यासाठी विविध साधने कशी वापरावीत याबददल हा गट मार्गदर्शन करेल.
 त्यासाठी विविध कार्यशाळा (  ज्या परीसरातील शिक्षकांच्या व अनौपचाररक असाव्या)  आयोजन करेल.
 गुणवत्तेसाठी संगणक वापरेन साधने कशी तयार करावी, याबाबत मार्गदर्शन हा गट करेल.
 त्यासाठी विविध माध्यमे वापरली जावीत. जसे व्हीडीओ, वेबसाईट इत्यादी.
 स्मार्ट फोन चा स्मार्ट वापर कसा करावा या बाबद शिक्षकांना मार्गदर्शक गट म्हणून कार्य करेल.

प्रशासकीय व्यवस्थापन
 या गटाचे कार्य हे प्रशासना मध्ये संगणकाच्या साहयाने काम करण्यासाठी आवश्यक कौशल्ये मुख्याध्यापक/ केंद्रप्रमुख / शिक्षण विस्तार अधिकारी/ शिक्षक यांना त्या त्या स्तरावर मार्गदर्शन करणे हे राहील.
 शिक्षकांच्या मागची प्रशासकिय कामे कमीत कमी करण्यासाठी त्यांना उपलब्ध साहित्याचा / माहितीचा प्रभावी वापर कसा करावा याबददल मार्गदर्शन करणे हे कार्य राहील.
 माहितीचे संकनल कसे करावे तसेच माहिती प्रोसेस कशी करावी याबाबत मार्गदर्शन हा गट करेल.
 माहितीच्या व्यवस्थापणाबाबत.हा गट प्रामुख्याने लक्ष देईल जेणे करुन तीच ती माहिती पुन:पुन्हा मागविली जाऊ नये.
 स्मार्ट फोन चा वापर करुन प्रशासन M-प्रशासन कसे होईल याबाबत मार्गदर्शन हा गट करेल
विद्यार्थ्यांसाठी सहज सोपी तंत्र साधने
 या गटाचे कार्य हे वर्ग अध्यापनासाठी विविध प्रकारची तंत्र साधनांची माहिती गोळा करणे हे असेल.
 तंत्र साधने ( Hardware ) म्हणजे फक्त संगणक संच नाही तर उपलब्ध असलेली सर्व माहिती तंत्रज्ञानाची माध्यमे यांच्या बददल माहिती मिळविणे व ती वर्ग अध्यापनात वापरण्या साठी कसे नियोजन करावे लागेल हे पाहणे.
 इंटरनेट वर उपलब्ध असलेली विविध साधने तसेच नवनवीन तंत्रज्ञान यांची माहिती करुन घेणे व त्यांचा विद्यार्थ्यांसाठी कसा वापर करता येईल याबददल मार्गदर्शन करणे. ( उदा N- Computers, Raspberry PI, Banana Pi, Android TV, Chrome Cast, Mobile devices, Arduinio, Clickers इ.)

विनामुल्य अथवा कमीत कमी खर्चात संसाधने
 या गटाचे कार्य हे उपलब्ध असलेले विविध सॉफटवेअर्स मग ती एक तर विनामूल्य असावी किंवा कमीत कमी खार्चिक असावी, असे शोधून त्यावर मार्गदर्शन करणे.
 रेडीमेड इ लर्निंग साहित्याचा वापर टाळून त्याऐवजी विषयवार फ्री टूल्स , Android , Windows, Linux अशा वेगवेगळया प्लॅटफॉर्म वर शोधून त्यांचा वापर कसा करावा याबाबत टयूटोरीअल्स बनविणे
 अशी संसाधने शिक्षकांना उपलब्ध करुन देणे / त्याबाबत त्यांना वापरण्यास प्रोत्साहन देणे.
 संसाधने विकसित करण्यासाठी शिक्षकांचा सहभाग घेणे. ( उदा. Voice Over, कविता गायन, संगित ) त्यासाठी असे साहित्य शाळांपर्यंत पोचण्ण्यासाठी प्रयत्न करणे 
 हे सर्व साहित्य वेब पोर्टल वर विनामूल्य व GNU GPL  अंतर्गत मालकी हक्क विरहित उपलब्ध असेल. 
सर्व गट हे एकमेकांच्या समन्वयाने काम करतील व यातील संसाधनांवर काम करतील. त्यासाठी एकत्रित चर्चा घडवून आणने अपेक्षित असेल. तयार झालेले साहित्य /  टयूटोरीअल्स यांना कुणालाही व्यावसायिक वापरासाठी परवानगी देण्यात येणार नाही.
13:32
🌈तंत्र शिक्षणाची नवी पहाट

            १८ एप्रिल रोजी तंत्रास्नेही शिक्षकांची सहविचार सभा विद्यापरीषद येथे संपन्न झाली. या सहविचार सभेसाठी सबंध महाराष्ट्रातून तंत्रस्नेही शिक्षक आलेले होते. IIT मुंबई, MKCL व इतर काही कंपन्यांचे प्रतिनिधी या सभेसाठी उपस्थित होते. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब , आयुक्त शिक्षण भापकर साहेब , शिक्षण संचालक जरग साहेब यांनी यावेळी मार्गदर्शन केले. 
            मा.जरग साहेबांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मा. नंदकुमार साहेबांनी MOTIVATION बद्दल खूप  छान उदाहरनासह चर्चा केली. TECH SAVVY TEACHERS या  WhatsApp वरील ग्रुप मधून सर्व तंत्रस्नेही शिक्षक कशा पद्धतीने एकत्र आले याबद्दल सांगितले. महाराष्ट्रातील सर्व शाळा २०२० पर्यंत डिजिटल स्कूल व सर्व  TECH SAVVY कसे बनतील यासाठी आराखडा बनवण्याविषयी चर्चा झाली. संदीप गुंड या शिक्षकाने केलेली पास्टेपाडा हि शाळा डिजिटल कशी बनवली व संदीप ची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात अशा पद्धतीचे काम सुरु झालेले आहे याबद्दल सांगितले. 
             यानंतर तंत्रस्नेही शिक्षकांनी महाराष्ट्राच्या डिजिटल स्कूल च्या व्हिजन बद्दल सादरीकरण केले. 
अनिल सोनवणे - अनिल सोनवणे यांनी शिक्षकांची पाच गटात विभागणी केली व प्रत्येक गटाची उद्दिष्टे व कार्यपद्धती या बद्दल PPT च्या सहाय्याने माहिती दिली. ते गट पुढील प्रमाणे.
1.      प्रोत्साहन
2.      शिक्षक गुणवत्ता
3.      प्रशासकीय व्यवस्थापन
4.      विद्यार्थ्यांसाठी सहज सोपी तंत्रासाधने
5.      विनामूल्य अथवा कमीत कमी खर्चात संसाधने
2.      बालाजी जाधव – बालाजी जाधव यांनी शिक्षकांनी USER न होता creator व्हा असा सल्ला दिला. स्वतःच्या बेब साईट विषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले कि व्हिडीओ निर्मिती कौशल्य आत्मसात करायला हवे. त्यांनी स्वतः १३० व्हिडीओ बनवल्या आहेत.
3.      सुरेश भारती – पहिलीपासून माहिती तंत्रज्ञानाचा वापर अध्यापनात करण्यात यावा त्यासाठी पाठ्यक्रम बनविला जावा. ICT ची परीक्षा व्हावी. कार्यानुभव या विषयातील माहिती तंत्रज्ञान हा विषय अनिवार्य असावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
4.      संदीप गुंड – संदीप गुंड यांनी स्वतःच्या शाळेचा व्हिडिओ दाखवला. त्यांच्या डिजिटल स्कुल विषयी PPT च्या सह्हायाने माहिती सांगितली. डिजिटल स्कूल मध्ये interactive learning चे महत्व सांगितले. त्यांच्या शाळेतील मुले स्वतः TAB कसा हाताळतात, मुल स्वतः स्वतः च्या TAB च्या सह्हायाने मूल्यमापन कसे करतात हे सांगितले. मुलांच्या घरीही TAB द्वारे अभ्यास करण्यासाठी TAB TV ला जोडण्याची सोय करण्यात आलेली आहे.
अशा पद्धतीने समाज सहभागातून शाळेचा तांत्रिक विकास कसा केला व आदिवासी पाड्यावर तंत्रशिक्षणाची नवी पाहत कशी उगवली याबद्दल अनमोल मार्गदर्शन केले.
5.      सावंत साहेब – MKCL चे व्यवस्थापकीय संचालक यांनी बालभारतीच्या पुस्तकांना स्टीकर चिटकवले जावेत. पुस्तकात video, audio, multimedia content तेथे जोडला जावा असे सांगितले.
पुस्तक आणि वडिलांचा मोबाईल फोन यामुळे एकत्र येईल. पुस्तकं आकर्षक होतील त्यामुळे मुलांचा गळतीचा प्रश्न मिटेल. यामुळे ज्ञानराचानावादी शिक्षण मुलांना मिळेल. शिक्षण वेध व जडण घडण या मासिकात ई शिक्षणाच्या संदर्भातील लेख ते लिहित आहेत याबद्दल सांगितले.
6.      रणजीत देसले – यांनी शिक्षक पालक गट कसा तयार केला व त्यातून गुणवत्ता विकासास कशी मदत झाली याविषयी अनुभव कथन केले.
7.      प्रा. भुतडा सर – यांनी बनवलेल्या वेगवेगळ्या software ची माहिती दिली व त्यांची उपयुक्तता सांगितली.
8.      सुनील आलोरकर – त्यांच्या z.p.guruji.com या वेब साईट विषयी माहिती सांगितली. या वेब साईट वर असलेल्या वेगवेगळ्या मार्गदर्शक व्हिडिओ शिक्षकांना दाखवले व याद्वारे शिक्षक स्वतः तंत्रास्नेही होऊ शकतात हे सांगितले.
9.      सोमनाथ वाळके – यांनी आपल्या शाळेत मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडीओ तयार केला आहे. विविध software चा उपयोग करून गुणवत्ता विकास साधला जावा हे सांगितले.
10.  राम सलगुडे – यांनी स्वतः च्या ब्लॉग द्वारे पेपर लेस स्कूल कसे केले याबद्दल सांगितले.
अशा बऱ्याच तंत्रस्नेही शिक्षकांनी सादरीकरण केले, व्हिडिओ दाखवले. मा. नंदकुमार साहेबांनी त्यांचे भरभरून कौतुक केले. भाऊसाहेब चासकर यांनी सुंदर संचलन केले.
मा. भापकर साहेब (आयुक्त शिक्षण) यांनी तंत्रास्नेही शिक्षकांना मार्गदर्शन केले. शिक्षकांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. डिजिटल स्कूल करण्यासाठी शिक्षकांना संपूर्ण सहकार्य केले जाईल असे सांगितले.
मा. जरग साहेबांनी सर्व तंत्रास्नेही शिक्षकांनी जीवन शिक्षण साठी आपण राबवत असलेल्या प्रयोगाबद्दल लेख पाठवावे असे आवाहन केले. तंत्राशिक्षानाबद्दल जीवनशिक्षण व्हा स्वतंत्र अंक काढला जाईल असे सांगितले.
प्रशांत कऱ्हाडे, संतोष भोंबळे यांनी TECH SAVVY TEACHERS या WhatsApp ग्रुप च्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व तंत्रास्नेही शिक्षकांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळेच तंत्रशिक्षणाची वाटचाल वेगाने सुरु झाली.
आजच्या सहविचार सभेतून एक नवीन उर्जा घेऊन प्रत्येक जन जात होता. ONLINE भेटणारा मित्र आज OFFLINE भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. नंदकुमार साहेबांची प्रेरणा घेऊन अहोरात्र परिश्रम करणारे तंत्रस्नेही शिक्षकांनी आपापली कौशल्य येथे SHARE केले. मगर साहेबांनी छान मार्गदर्शन केले. विद्यापरीषदेने या सहविचार सभेचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
13:32

1 comment:

Ravindra Raut said...

खूपच प्रेरणादायक ठरली १८/४ ची सहविचार सभा .राज्यातील जि. प. च्या शाळांना आता नक्कीच "अच्छे दिन " आल्यावाचून राहणार नाही .......