Tuesday 22 December 2015

मैत्री:सातारा जिल्हा परिषदेचा नाविण्यपुर्ण उपक्रम

मैत्री मतिमंद मुली व महिला समवेत सॅनिटरी नॅपकिन
पुरविण्याची नाविन्यपूर्ण योजना
प्रस्तावना
जिल्हा परिषद सातारा, एकात्मिक बाल विकास सेवा
योजना, जिल्हा कक्ष व सातारा जिल्हा केंमिस्ट
असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा
जिल्ह्यात मतिमंद मुली व महिला यांना सॅनिटरी नॅपकिनचा
वाटप करणेचा नाविन्यपूर्ण उपक्रमास २ आक्टोंबर 2015 पासून
सुरुवात झालेली आहे. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हयातील
११ ते ५० वयोगटातील मतिमंद मुली व महिलांना दरमहा
सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.
पार्श्वभूमी
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत असणा-
या पर्य़वेक्षिका व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून
सातारा जिल्ह्यातील मतिमंद मुली व महिलांचे सर्वेक्षण
करण्यात आले. या सर्वेक्षणामधे सातारा जिल्ह्यात १२२९
मतिमंद मुली व महिला आढळून आल्या. या मुली व महिलांना
दरमहा मासिक पाळीच्या वेळी होणा-या रक्तस्त्रावामुळे
त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या काळात आवश्य ती
स्वच्छता राखली जावी व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
टाळावेत यासाठी या मुली व महिलांना सॅनिटरी
नॅपकिन्सचा वाटप करणेची योजना आखणेत आली. मा. अप्पर
आयुक्त, पुणे विभाग, पुणे श्री. श्याम देशपांडे, यांच्या प्रेरणेतून
तसेच सातारा जि.प. अध्यक्ष मा.श्री. माणिकराव
सोनवलकर, सातारा जिल्हाधिकारी मा. श्री. अश्विन
मुद्गल व सातारा जि.प. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. नितीन पाटील, यांच्या मार्गदर्शनातून व उप मुख्य
कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री. जावेद शेख यांच्या
प्रयत्नातून या योजनेस सुरुवात करण्यात आली.
योजनेचे स्वरुप
या योजने अंतर्गत दरमहा ५ तारखेपर्यंत तालुका स्तरावर
सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा केमिस्ट असोसिएशन मार्फत
करण्यात येणार असून त्याच महिन्याच्या १० तारखेपर्यंत बाल
विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी
सेविका यांच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पुरवठा
करण्यात येणार आहे.
ज्या गरजू व पात्र लाभार्थीपर्यंत ही योजना अजून पोहचली
नसेल अशा लाभार्थ्यांनी अथवा त्यांच्या पालकांनी,
कुटुंबीयांनी तालुका स्तरावरील एकात्मिक बाल विकास
सेवा योजना कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ
मिळवुन घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी मा. श्री. नितीन पाटील, यांनी केले
आहे.
तालुका स्तरावरील एकात्मिक बाल विकास सेवा योजना
कार्यालय तेथील संबधित अधिकारी व कार्यालयाचे
दुरध्वनी क्रमांक.
सातारा जिल्ह्यात मतिमंद मुली व महिला यांना सॅनिटरी
नॅपकिनचे वाटप करणेचा नाविन्यपूर्ण उपक्रमास सुरुवात दि. 2
आक्टोंबर 2015 गांधी जयंतीपासुन करणेत आली. या
कार्यक्रमात मा. अध्यक्ष, श्री. माणिकराव सोनवलकर यांनी
मार्गदर्शन केले. तसेच मा. अध्यक्ष श्री. माणिकराव सोनवलकर
मा. श्री. नितीन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.
श्री. अमित कदम, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जि.प.
सातारा, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री.
जावेद शेख, सातारा केमीस्ट व ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष
श्री. पाटील व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. त्यांचे
शुभहस्ते मतिमंद मुली व महिला यांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप
करणेत आले.

सातारा आॅरगॅनिक: सातारा जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम


सातारा जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम : सातारा
ऑरगॅनिक
(सेंद्रीय शेतीच्या दिशेने...)
प्रस्तावना
अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी अधिक उत्पादन देणा-
या व संकरीत जाती,रासायनिक खते आणि रासायनिक
कीटकनाशके यांचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात येत
आहे.त्याच्या वापरामुळे पीक उत्पादनात निश्चितच वाढ
झाली,परंतू रासायनिक खते व कीटकनाशकांच्या सततच्या व
अयोग्य वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडणे,पिकांची
उत्पादकता कमी होणे व उत्पादित शेतमालाची प्रत
खालावणे,मानव व पशूपक्षी यांच्या आरोग्यावर परिणाम
होणे असे दुष्परिणाम दिसून येत आहेत.त्याच प्रमाणे पाण्याचे
आणि वातावरणाचे प्रदूषणही मोठया प्रमाणावर होत आहे.हे
लक्षात घेता,सेंद्रीय शेती ही केवळ शेती पध्दती न राहता
जीनवशैली व्हावी यासाठी जिल्हयात सेंद्रीय शेतीस
प्रोत्साहन व सेंद्रीय शेतमाल विक्रीस सहायता करणेचा
अभिनव उपक्रम सातारा ऑरगॅनिक या नावाने शेतक-यांच्या
सहभागातून राबविण्यात येत आहे.
सातारा ऑरगॅनिक उपक्रमाचा प्रारंभ
दिनांक 15 ऑगस्ट 2015 रोजी सातारा जिल्हा परिषदेचा
सातारा ऑनगॅनिक या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ
मा.ना.श्री विजयराव शिवथरे,पालकमंत्री जिल्हा सातारा
यांचे हस्ते व मा. श्री. नितीन पाटील, मुख्य कार्यकारी
अधिकारी, जि.प. सातारा यांचे उपस्थितीत करणेत आला.
अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी अधिक उत्पादन देणा-
या व संकरीत जाती,रासायनिक खते आणि रासायनिक
कीटकनाशके यांचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात येत
आहे.त्याच्या वापरामुळे पीक उत्पादनात निश्चितच वाढ
झाली,परंतू रासायनिक खते व कीटकनाशकांच्या सततच्या व
अयोग्य वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडणे, पिकांची
उत्पादकता कमी होणे व उत्पादित शेतमालाची प्रत
खालावणे,मानव व पशूपक्षी यांच्या आरोग्यावर परिणाम
होणे असे दुष्परिणाम दिसून येत आहेत.त्याच प्रमाणे पाण्याचे
आणि वातावरणाचे प्रदूषणही मोठया प्रमाणावर होत आहे.हे
लक्षात घेता,सेंद्रीय शेती ही केवळ शेती पध्दती न राहता
जीनवशैली व्हावी यासाठी जिल्हयात सेंद्रीय शेतीस
प्रोत्साहन व सेंद्रीय शेतमाल विक्रीस सहायता करणेचा
अभिनव उपक्रम सातारा ऑरगॅनिक या नावाने शेतक-यांच्या
सहभागातून राबविण्यात येत आहे.
सातारा जिल्हयातील सेंद्रीय शेतीच्या प्रमाणीकरणासाठी
नोंदणी केलेल्या उत्पादक शेतक-यांकडील शेतमालाची विक्री
जिल्हयातील महीला बचत गटांचे मार्फत करण्याचा मानस
असुन सदर विक्री केंद्रासाठी पंचायत समिती सातारा येथिल
डी.आर.डी.ए.कडील उभारण्यात आलेल्या दुकान गाळयामध्ये
सेंद्रीय उत्पादक शेतक-यांचा शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध
करून त्याची विक्री महीला बचत गटामार्फत करण्यात येत
आहे. या उपक्रमा अंतर्गत सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत केलेला
भाजीपाला,आले,हळद,काकडी,मुळा,कोथिंबीर,पेरू,सिताफळ,सेंद्रीय
गुळ,काकवी,चवळी,गहू,ज्वारी,मोहरी,हरभरा
डाळ,कांदा,घेवडा डाळ विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले
आहेत. तसेच सेंद्रीय पध्दतीने तयार केलेले आवळा ज्यूस,फेस
पॅक,शाम्पू,साबण देखील विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले
आहेत.
सातारा ऑरगॅनिक उपक्रमांतर्गत सातारा पंचायत समितीचे
आवारात सुरू करण्यात आलेले सदरचे सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र
आठवडयातून गुरूवार व रविवार या दोन दिवशी सुरू राहणार
असून जिल्हयातील इतर ठीकाणी देखील अशा प्रकारचे केंद्र सुरू
करण्याचे नियोजित आहे.शेतक-यांच्या सहभागातून सुरू
करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमास मा.ना.पालकमंत्री
महोदय यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.या उपक्रमाची माहीती
सातारा जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ. www.satarazp.gov.in
यावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उपक्रमा अंतर्गत
सहभागी शेतक-यांचे शेतावर क्षेत्रीय भेट देणे,शेतक-यांना
प्रशिक्षण देणे,सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरणासाठी मदत करणे
तसेच कृषि विद्यापीठामध्ये शेतक-यांचे सहलीचे आयोजन करणे
इत्यादी उप्रकम देखील राबविण्यात येणार आहेत.
सदर कार्यक्रमास सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा.श्री
सोनवलकर, उपाध्यक्ष मा.श्री रवि साळुंखे, समाजकल्याण
सभापती मा.श्री. माळवे, कृषि,पशूसंवर्धन व दुग्धशाळा
समितीचे सभापती मा.श्री शिवाजीराव शिंदे, सातारा
पंचायत समितीच्या सभापती श्रीमती कविता चव्हाण
इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.तसेच जिल्हा परिषदेचे
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री
पी.बी.पाटील, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामिण विकास
यंत्रणा मा.श्री थाडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
मा.श्री जितेंद्र शिंदे, प्रकल्प संचालक (आत्मा) मा.श्री गणेश
घोरपडे, कृषि विकास अधिकारी मा.श्री चांगदेव बागल तसेच
जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख व सातारा पंचायत समितीचे गट
विकास अधिकारी उपस्थित होते.
उपक्रमाच्या ठळक बाबी
1) सेंद्रीय शेती करणारे शेतकरी निश्चित करणे
जिल्हयात सेंद्रीय पध्दतीने सेंद्रीय शेती करणारे शेतकरी शोधून
त्यांचे कडील सेंद्रीय शेती पध्दतीचा व त्याव्दारे उत्पादीत
होणा-या शेत मालाची माहीती संकलित करणेसाठी अशा
शेतक-यांना एकत्रित करून त्यांची जिल्हा परिषद स्तरावर
कार्यशाळा आयोजित करणे.जिल्हा परिषद स्तरावर
दि.6/7/2015 रोजी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले
होते त्यामध्ये जिल्हयातील 94 शेतक-यांनी सहभाग घेतला.
2) कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतक-यांकडील प्राप्त
माहीती संगणकीकृत करणे
कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतक-यांची सर्वांगिन माहीती
घेण्यासाठी एक प्रश्नावली तयार करण्यात आली होती व
त्यामध्ये सर्व शेतक-यांची सेंद्रीय शेती विषयक माहीती
संकलित करण्यात आली आहे.उपस्थित शेतक-यांनी सेंद्रीय शेत
मालाच्या उत्पादना बाबत तसेच त्याचे विक्रीसाठी
बाजारपेठ मिळणून देणे करीता जिल्हा परिषदेने पुढाकार घेणे
बाबत मागणी केली.
3) विक्री योग्य सेंद्रीय शेतमालाची शेतक-यांकडील
उपलब्धता बाबतची माहीती घेणे
कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतक-यांपैकी ज्या शेतक-यांकडे
सेंद्रीय शेतमाल उपलब्ध आहे तसेच नजिकच्या काळात उपलब्ध
करणेचे नियोजित आहे याबाबतची माहीती जिल्हा परिषद
स्तरावरील दिनांक 17/7/2015 रोजीचे बैठकीत संकलित
करण्यात आली आहे.
4) सातारा ऑरगॅनिक उपक्रम सुरू करणे
सेंद्रीय शेतीस चालना देणेसाठी जिल्हा परिषदे मार्फत शेतक-
यांच्या सहभागातून सातारा ऑरगॅनिक या अभिनव
उपक्रमाची प्रत्याक्षात अंमलबजावणी खालील टप्प्यानुसार
करण्यात येणार आहे.
4.1) सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देणे
ज्या शेतक-यांनी सेंद्रीय शेतीचे प्रमाणीकरणासाठी नोंदणी
केली आहे अथवा करीत आहेत त्या सेंद्रीय शेती उत्पादकांना
एकत्रित करून त्यांचे कडील उत्पादीत शेत मालाच्या विक्री
साठी सध्या पंचायत समिती सातारा येथिल डी.आर.डी.ए.
कडील गाळे उपलब्ध करून देणेत आले आहेत. दि.15 ऑगस्ट 2015
रोजी या केंद्रावर सेंद्रीय शेतमालाची विक्री सुरू करण्यात येत
आहे. आठवडयातील गुरूवार व रविवार या दोन दिवशी सदरचे
विक्री केंद्र सुरू राहणार आहे. तसेच सेंद्रीय शेतीसाठी
प्रमाणीत केलेल्या निविष्ठा देखील शेक-यांना उपलब्ध
व्हाव्यात यासाठी प्रतापसिंह सेंद्रीय शेती केंद्र सातारा
येथिल गाळे उपलब्ध करून दिले जाणार आहेत.सदर उपक्रमास
मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन भवितव्यात इतर तालुक्यात
देखील विक्री केंद्र सुरू करता येणार आहे.
4.2) सेंद्रीय शेतमालाची विक्री महीला बचत गटामार्फत करणे
पंचायत समिती सातारा येथिल डी.आर.डी.ए. कडील
गाळयामध्ये शेतक-यांनी सेंद्रीय शेतमाल आणून दिल्यानंतर
त्याची विक्री महीला बचत गटामार्फत ग्राहकांना करणेची
आहे त्यापोटी उत्पादक शेतक-यांनी ठराविक रक्कम प्रति दिन
देणेची आहे.सदर शेतमालाच्या विक्रीवेळी ग्राहकास पावती
दिली जाणार असून पावतीवर पिक उत्पादक शेतक-याचे नांव
तसेच ग्राहकाचे नांव समाविष्ठ केलेले आहे जेणे करून ग्राहकास
आपण विकत घेतलेला माल कोणत्या शेतक-याने उत्पादीत केला
आहे हे समजेल.
4.3) उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी समन्वयक नेमणे
प्रत्येक तालुक्यातील सेंद्रीय शेती उत्पादक शेतक-यांशी संपर्क
साधणे,उपलब्ध शेतमालाची माहीती घेणे व विक्री केंद्रावर
उपलब्ध होणा-या शेतमालाच्या विक्रीचे वेळापत्रक तयार
करणे यासाठी जिल्हयात 11 तालुका शेतकरी समन्वयक तर
जिल्हास्तरावर 2 राजपत्रित अधिकारी यांची जिल्हा
समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
4.4) उपक्रमासाठी जिल्हास्तरीय कार्यकारी व सल्लागार
समित्या गठीत करणे
सदर उपक्रमाच्या अमलबजावणीचा आढावा घेणे,उपक्रमांतर्गत
शेतक-यांना इतर शासकीय योजनांचा लाभ देणे, उपक्रमांतर्गत
सहभागी शेतक-यांचे शेतीचे सेंद्रीयसाठी प्रमाणिकरण यंत्रणा
व शेतक-यांमध्ये समन्वय साधणे, दर महीन्याला एका उपक्रमशील
शेतक-यांचे शेतीवर क्षेत्रीय भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन
करणे,कृषि विज्ञान केंद्र बारामती तसेच धारवाड कृषि
विद्यापीठ येथे सेंद्रीय शेती बाबतचे प्रशिक्षण देणेसाठी
कार्यक्रमाचे आयोजन करणे इत्यादी साठी जिल्हास्तरावर
कृषि विकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय
कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे.तसेच या
उपक्रमाचा आढावा घेणे व आवश्यक सल्ला देणेसाठी मा.मुख्य
कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांचे
अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सल्लागार समिती गठीत
करण्यात आली आहे.सदर दोन्ही समित्यांची दर 3 महीन्यानी
सभा आयोजित केली जाणार आहे.
4.5) उपक्रमशील शेतक-यांचे शेतीवर क्षेत्रीय भेटी आयोजित
करणे
दर महीन्याला एका उपक्रमशील शेतक-यांचे शेतीवर क्षेत्रीय
भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार
आहे.त्यासाठी इच्छूक शेतक-यांनी त्यांचे सहभागापोटी
रू.100/- देणेचे आहेत.या क्षेत्रीय भेटीमध्ये तज्ञ विषय विशेषज्ञ
यांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.आत्मा अंतर्गत सदर क्षेत्रीय
भेटीसाठी अर्थसहाय उपलब्ध करून देणेत येणार आहे.
4.6) कृषि विज्ञान केंद्र व कृषि विद्यापीठ येथे प्रशिक्षण
कार्यक्रम आयोजित करणे
सातारा ऑरगॅनिक उपक्रमामध्ये सहभागी शेतक-यांसाठी
कृषि विज्ञान केंद्र बारामती येथे निवासी प्रशिक्षणाचे
आयोजन केले जाणार आहे तसेच कृषि विज्ञापीठ धारवाड येथे
शेतकरी सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे.
4.7) जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावरून प्रसिध्दी व माहीती
देणे
सातारा जिल्हा परिषदेच्या www.zpsatara.gov.in या
संकेतस्थळावर सातारा ऑरगॅनिक उपक्रमाची माहीती
प्रसिध्द करण्यात येत आहे.यामध्ये जिल्हा परिषदेकडे नोंदणी
केलेल्या शेतक-यांची सेंद्रीय शेती विषयक माहीती,त्यांनी
उत्पादीत केलेली पिके,उपलब्धतेचा कालावधी व साठा तसेच
अपेक्षित दर,शेतक-याचा पत्ता व संपर्क क्रमांक याबाबतची
माहीती प्रसिध्द केली जाणार आहे. तसेच या संकेतस्थळावर
ग्राहकांसाठी त्यांची सेंद्रीय शेत मालाची गरज तसेच काही
सुचना असल्यास याबाबतची माहीती देखील प्रसिध्द
करण्यात येणार आहे.जेणे करून उत्पादक शेतकरी व ग्राहक
दोघांनाही सेंद्रीय शेतमालाच्या खरेदी व विक्री बाबतच्या
माहीतीची देवाण-घेवाण करणे सुलभ होईल.सदर संकेतस्थळावर
शेतक-यांचे क्षेत्रीय भेटीचे वेळापत्रक दिले जाणार असून
त्यामध्ये सहभागी होणेसाठी ऑनलाईन नोंदणी करण्याची
सुविधा देणे येणार आहे.जिल्हयातील सेंद्रीय शेती पुरस्कार
विजेते शेतकरी तसेच शेतक-यांच्या यशोगाथा देखील प्रसिध्द
करण्यात येणार आहे.
सेंद्रीय शेतीस प्रोत्साहन व सेंद्रीय शेतमाल विक्रीस
सहायता करणेच्या उपक्रमाच्या मार्गदर्शक सुचना
अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठी अधिक उत्पादन देणा-
या व संकरीत जाती,रासायनिक खते आणि रासायनिक
कीटकनाशके यांचा मोठया प्रमाणावर वापर करण्यात येत
आहे.त्याच्या वापरामुळे पीक उत्पादनात निश्चितच वाढ
झाली,परंतू रासायनिक खते व कीटकनाशकांच्या सततच्या व
अयोग्य वापरामुळे जमिनीचे आरोग्य बिघडणे,पिकांची
उत्पादकता कमी होणे व उत्पादित शेतमालाची प्रत
खालावणे,मानव व पशूपक्षी यांच्या आरोग्यावर परिणाम
होणे असे दुष्परिणाम दिसून येत आहेत.त्याच प्रमाणे पाण्याचे
आणि वातावरणाचे प्रदूषणही मोठया प्रमाणावर होत आहे.हे
लक्षात घेता,सेंद्रीय शेती ही केवळ शेती पध्दती न राहता
जीनवशैली व्हावी यासाठी जिल्हयात सेंद्रीय शेतीस
प्रोत्साहन व सेंद्रीय शेतमाल विक्रीस सहायता करणेचा
उपक्रम राबविण्याचे प्रस्तावित आहे.सदर उपक्रम राबविणेमध्ये
सुसूत्रता यावी यासाठी मार्गदर्शक सुचना याव्दारे निर्गमित
करण्यात येत आहे.
सदर उपक्रमांतर्गत खालील महत्त्वाचे टप्पे निश्चित करून
उपक्रम राबविणेचा आहे.
1) सेंद्रीय शेती करणारे शेतकरी निश्चित करणे :- जिल्हयात
सेंद्रीय पध्दतीने सेंद्रीय शेती करणारे शेतकरी शोधून त्यांचे
कडील सेंद्रीय शेती पध्दतीचा व त्याव्दारे उत्पादीत होणा-
या शेत मालाची माहीती संकलित करणेसाठी अशा शेतक-
यांना एकत्रित करून त्यांची जिल्हा परिषद स्तरावर
कार्यशाळा आयोजित करणे.
2) कार्यशाळेमध्ये उपस्थित शेतक-यांकडील प्राप्त माहीती
संगणकीकृत करणे.
3) विक्री योग्य सेंद्रीय शेतमालाची शेतक-यांकडील
उपलब्धता बाबतची माहीती घेणे.
4) जिल्हास्तरावर सदर उपक्रमाच्या सनियंत्रणासाठी
कार्यकारी समिती गठीत करणे.
5) सेंद्रीय शेती करणा-या शेतक-यांचे प्रतिनिधीक स्वरूपात
प्रत्येक तालुक्यासाठी एका शेतक-याची त्या तालुक्यासाठी
समन्वयक म्हणून नेमणूक करणे.
6) 2 ऑक्टोंबर 2015 रोजी सेंद्रीय शेतमालाच्या विक्रीचा
शुभारंभ करणे.
दिनांक 6/7/2015 रोजी जिल्हा परिषद स्तरावर सेंद्रीय शेती
करणा-या शेतक-यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली
होती तसेच दिनांक 17/7/2015 रोजी ज्या शेतक-यांकडे
सेंद्रीय शेतमाल विक्रीसाठी उपलब्ध आहे अशा शेतक-यांची
सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये सेंद्रीय
शेतमालाच्या विक्रीसाठी नियोजन करण्यात आले व दिनांक
2 ऑक्टोंबर 2015 रोजी प्रथमत: सातारा,कराड व फलटण
तालुक्यात सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्र सुरू करणेचे निश्चित
करण्यात आले आहे.सदर सभेमध्ये खालील इच्छूक शेतक-यांची
तालुका समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
तालुका समन्वयक
अ.क्र. समन्वयकाचे नांव गांव व तालुका संपर्क क्रमांक समन्वयासाठी तालुका
1 श्री प्रकाश मारूती शिंदे रा.परखंदी ता.वाई 9324210380 वाई
2 श्री सुधाकर शंकर साबळे रा.वडूथ ता.सातारा 7350857009 सातारा
3 श्री समिर राजाराम झांजूर्णे रा.तडवळे सं.कोरेगांव
ता.कोरेगांव
9922910326 कोरेगांव
4 श्री संभाजी शिवाजी कदम रा.गोरेगांव वांगी
ता.खटाव
9881359557 खटाव
5 श्री विकास मारूती देशमुख रा.दुशेरे ता.कराड 9921157873,
9765193427
कराड
6 श्री दिलीप बाबूराव माने रा.म्हसवड ता.माण 9423023022 माण
7 श्री सुर्यकांत ऊर्फ राजेंद्र तानाजी काळे रा.काळगांव ता.पाटण 9823490861,
7588384701
पाटण
8 श्री कल्याण काटे रा.फडतरवाडी
ता.फलटण
9975148280 फलटण
9 श्री शिवाजी शिंगनाथ सोनावणे रा.शिंदेवाडी
ता.खंडाळा
9860844530 खंडाळा
10 श्री जितेंद्र मारूती कदम रा.रायगांव ता.जावली 9423803746 जावली
11 श्रीमती मोना मॅडम रा.भोसे ता.महाबळेश्वर 9819391231 महाबळेश्वर
त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर खालील अधिकारी यांची
नेमणूक जिल्हा समन्वयक म्हणून करण्यात येत आहे.
जिल्हा समन्वयक
अ.क्र. समन्वयकाचे नांव कार्यालयाचे नांव संपर्क क्रमांक शेरा
1 श्री प्रकाश व्हि.पवार जिल्हा कृषि अधिकारी
जि.प.सातारा
9423033939 जिल्हा स्तरावर समन्वयक
2 श्री मनोज राजाराम भोसले सहायक प्रकल्प
अधिकारी, जिल्हा
ग्रामिण विकास यंत्रणा
सातारा
9421121968 जिल्हा स्तरावर समन्वयक
तालुका व जिल्हा समन्वयक यांची जबाबदारी
1) तालुकास्तरीय समन्वयक यांनी आपले तालुक्यातील सेंद्रीय
पध्दतीने शेती करणा-या शेतक-यांचा संपर्क साधून उत्पादीत
होणा-या मालाचा अंदाज घ्यावा व कोणत्या कालावधीत
कोणत्या शेतक-याकडील कोणत्या शेतमालाची विक्री
साठी उपलब्धता होणार आहे याची माहीती घ्यावी. सदर
माहीती जिल्हा समन्वयक यांना वेळोवेळी देणे.तसेच जिल्हा
समन्वयक यांचे कडून वेळोवेळी मिळणारे संदेश संबंधित सर्व शेतक-
यांपर्यंत पोहचविणे.
2) जिल्हा समन्वयक यांनी शेतमालाच्या उपलब्धतेनुसार
विक्री केंद्र निहाय विक्रीचे वेळापत्रक तयार करावे.तालुका
समन्वयक यांचेशी संपर्क साधून वेळापत्रकाप्रमाणे सेंद्रीय
शेतमालाची उपलब्धता संबंधित विक्री केंद्रावर होईल याचे
नियोजन करावे.विक्री केंद्राबाबत तसेच ग्राहकांच्या
तक्रारी असल्यास त्याचे निवारण करणे.सातारा जिल्हा
परिषदेच्या संकेत स्थळावर उपक्रमा अंतर्गत विक्री साठी
उपलब्ध असणा-या शेतमालाची शेतक-यांच्या नावासह
अद्यावत माहीती अपलोड करणे. सदर उपक्रमांतर्गत सेंद्रीय
शेती उत्पादक शेतकरी,तालुका समन्वयक व ग्राहक यांचेशी
संबंधित सर्व विषया बाबत सनियंत्रण व समन्वय राखणेचे
कामकाज पार पाडणे.
जिल्हास्तरीय कार्यकारी समिती
अ.क्र. अधिकारी यांचे पदनाम समितीमधील पदनांम
1 कृषि विकास अधिकारी,जि.प.सातारा अध्यक्ष
2 सर्व तालुका समन्वयक (11) सदस्य
3 सहायक प्रकल्प अधिकारी, जिग्रावि यंत्रणा सातारा सदस्य
4 जिल्हा कृषि अधिकारी (सामान्य) जि.प.सातारा सदस्य सचिव
जिल्हास्तरीय कार्यकारी समितीच्या जबाबदा-या
सदर समितीची बैठक दर तीन महीन्यांनी आयोजित
करावी.समिती मध्ये सदर उपक्रमा बाबत सांगोपांग चर्चा
करून आढावा घ्यावा.सेंद्रीय प्रमाणिकरणा बाबत शेतकरी व
प्रमाणिकरण यंत्रणा यांचेमध्ये समन्वय साधावा.सेंद्रीय शेती
बाबत शासनाच्या विविध योजनांचा उपयोग सदर
उपक्रमातील सहभागी शेतक-यांसाठी करून देणेसाठी प्रयत्न
करावेत.उपक्रमा अंतर्गत उपलब्ध सेंद्रीय शेतमालाच्या विक्री
दराबाबत सनियंत्रण राखावे.उपक्रमांतर्गत ग्राहकांची
फसवणूक होऊ नये याची दक्षता घ्यावी.जिल्हयात सेंद्रीय
शेती करणा-या शेतक-यांच्या शेतावर क्षेत्रीय मासिक भेटींचा
कार्यक्रम तयार करणे तसेच सेंद्रीय शेती बाबत उपक्रमाची
माहीतीसाठी शेतक-यांची कृषि विद्यापीठाकडे भेट
आयोजित करणे. कृषि विज्ञान केंद्र,बारामती येथे शेतक-
यांसाठी सेंद्रीय शेती बाबत निवासी कार्यशाळा आयोजित
करणे.आत्मा तसेच जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेकडील
शेतकरी भेटीच्या योजनेचा उपयोग करण्यात यावा.तसेच
सेंद्रीय शेतमाल विक्री केंद्रांबाबत सर्व संबंधितांशी समन्वय
राखणे.
जिल्हास्तरीय सल्लागार समिती
जिल्हास्तरावर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा
परिषद सातारा यांचे अध्यक्षतेखाली सल्लागार समिती
गठीत करण्यात येत असून सदर समितीची दर तीन महीन्यांनी
सभा आयोजित करावी व उपक्रमाचा आढावा घेऊन
आवश्यकत्या सुचना कराव्यात.समितीची रचना खालील
प्रमाणे राहील.
अ.क्र. अधिकारी यांचे पदनाम समितीमधील पदनांम
1 मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.सातारा अध्यक्ष
2 अति.मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प.सातारा सह अध्यक्ष
3 प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा सातारा सदस्य
4 प्रकल्प संचालक (आत्मा) सातारा सदस्य
5 सरव्यवस्थापक,जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.सातारा सदस्य
6 जिल्हा उपनिबंधक सातारा सदस्य
7 जिल्हा आरोग्य अधिकारी,जि.प.सातारा सदस्य
8 जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी,जि.प.सातारा सदस्य
9 जिल्हा पणन अधिकारी,सातारा सदस्य
10 शेतकरी प्रतिनिधी –
1) श्री शंकरराव दिनकर खोत,रा.वाजेवाडी ता.कराड
2)श्री सुधिर अरविंद चिवटे रा.तळबीड ता.कराड
सदस्य
11 कृषि विकास अधिकारी,जि.प.सातारा सदस्य सचिव
वर नमुद केले प्रमाणे सेंद्रीय शेतीस व सेंद्रीय शेतमालाच्या
विक्रीसाठी बाजारपेठ मिळवून देण्याच्या सदर उपक्रमाची
अंमलबजावणी मार्गदर्शक सुचनांप्रमाणे करावी