| अ.नं | शिक्षकाचे नाव | शाळा | केंद्र |
|---|---|---|---|
| 1 | नांगरे किरण रमेश | किवळ | चिखली |
| 2 | वाघ कृष्णा चंद्रकांत | कवठे | हेळगाव |
| 3 | तांबोळी रशीद दस्तगीर | टेंभू | गोळेश्वर |
| 4 | शिरतोड आबा राजाराम | रेठरे खुर्द | वाठार |
| 5 | पाटील विजय राजाराम | बाबरमाची | बनवडी |
| 6 | हिले जमुना पांडुरंग | वारुंजी | सुपने |
| 7 | वायदंडे सुरेखा प्रभाकर | नारायणवाडी | काले |
| 8 | कुंभार सुजाता प्रदीप | शास्त्रीनगर | मलकापूर |
| 9 | यादव माधुरी बा. | यशवंतनगर नं.२ | मलकापूर |
| 10 | लोकरे सुनिता शंकर | आगाशिवनगर नं.२ | मलकापूर |
| 11 | पांढरपट्टे रुपाली राजेंद्र | केंद्रशाळा विंग | विंग |
| 12 | उमाटे रामचंद्र ज्ञानदेव | केंद्रशाळा मलकापूर | मलकापूर |
| 13 | बसागरे जोतीराम बसागर | कोपर्डे हवेली | कोपर्डेहवेली |
| 14 | शेंडे संजय महादेव | विठोबाचीवाडी | ओंड |
| 15 | फल्ले अमित चंद्रकांत | लटकेवाडी | ओंड |
| 16 | कुत्ते आनंद वसंतराव | आणे | विंग |
| 17 | नागे सुनील तातोबा | कोरीवळे | इंदोली |
| 18 | शिंदे संतोष विलास | माध्य.विद्यालय बेलवडे हवेली | वहागाव |
| 19 | चव्हाण दिपक रणजीत | वाघेरी | बनवडी |
| 20 | देवकर नकुशी पांडुरंग | वाघेश्वर | मसूर |
| 21 | राऊत सीमा सदाशिव | शहापूर | मसूर |
| 22 | गवळी सतीश खाशाबा | मनु | उंडाळे |
| 23 | शेख अनिस हैदर | यादवमळा कासारशिरंबे | वाठार |
| 24 | जंगम उमाकांत राजाराम | मोरेमळा विंग | विंग |
| 25 | रासाटे शशिकांत नानासो | बेलवडे बु | वाठार |
| 26 | नायकवडी निलम कासम | शिबेवाडी | कोळे |
| 27 | भंडारे विशाल संभाजी | काटेकरवाडी | येवती |
| २८ | महेश शहाजी लोखंडे | शिंदेमळा शरदनगर | गोळेश्वर |
Saturday, 22 August 2015
तंत्रस्नेही सहविचारसभेस तंत्रस्नेही दि.२२/८/२०१५
Friday, 21 August 2015
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा मिटिंग दि. १९/८/२०१५ अहवाल
मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.सातारा मिटिंग दि. १९/८/२०१५ अहवाल आज दि.१९/८/२०१५ रोजी क्रीडाशिक्षक ,योगशिक्षक ,व तंत्रस्नेही शिक्षक प्रत्येक तालुक्यातून आलेले होते. .आदरणीय मा.श्री.नरळेसाहेब यांनी ई लर्निंग आढावा घेतला.स्वागत केले. मा.श्री .नितीन पाटीलसाहेब मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.सातारा यांनी केलेल्या भाषणाचे प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आपणा सर्वांना एकत्र काम करायचे आहे .या वर्षी नाविन्यपूर्ण प्रोग्राम सुरु करत आहोत.सगळे कन्व्हर्जन प्रोग्राम आहेत. शिक्षण काही आरोग्याहून वेगळे नाही.शिक्षण आरोग्य समाजकल्याणापेक्षा वेगळे नाही .शिक्षणात इमोशनल क्वोशंट, नैतिक शिक्षण ,शैक्षणिक आरोग्य या गोष्टी आल्या.जे चांगले चालू आहे ते चालू ठेवावे.आज आपण पाच प्रोग्राम सुरु करत आहोत. १)सातारा ऑरग्यनिक -काही ठिकाणी दुष्काळ काही टिकाणी खूप पाऊस पडतो उत्पन्न वाढविण्यास खूप फर्टिलायजर वापरतात जमीन कस कमी झा ला शाश्वत सेन्द्रीयशेती हा यापाठीमागचा उपाय आहे महिला बचतगट शिक्षक यात काम करतील.स्वयंस्फूर्तीने रेसोर्स पर्सन काम करणारे हवेत. २)आपले आरोग्य आपल्या हाती-डायबेटीस शुगर हे आजारांचे कारण व्यायाम कमी मनावर ताबा कमी मिटींगला डॉक्टर बोलावले नाही कारण आजारी पडू नये म्हणून काम करायचे आहे. सीडी तयार आहे तालुकास्तरीय समन्वयक नेमायचे आहेत.आपला आहार.व महिलांचे आरोग्य महत्वाचा भाग आहे. ३)आपली वाटचाल स्वावलंबना साठी -महिलास रोजगार उपलब्ध करून देणे . ४)मैत्री -विपश्यना आनापान ,क्रीदापातुंचे मन स्थिर हवे.तालुका समन्वयक नेमायचे आहेत. ५)तालुका रिलेटेड प्रोग्राम -दुष्काळ माण खटाव मध्ये काम करणे . इतर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ,क्रीडाप्रबोधिनी ,ई लर्निंग,कला सांस्कृतिक गोष्टींचाही समावेश करता येईल .
*क्रीडाप्रबोधिनी आढावा -बरकडे सर क्रीडा समन्वयक फलटण यांनी २००९-०१० साली भुजबळ सरांनी ३ मुले क्रीडाप्रबोधीनीस निवड बालेवाडीस कशी झाली२०१०-०११ तालुक्यातून १८ मुले लागली राज्याच्या ७२ मध्ये २५%पुढे २०११-०१२ साली जिल्ह्यातून १६२ राज्याशी प्रमाण होते ६७%२०१२-०१३ साली स्पर्धा झाली नाही निकष कडक झाले २०१३-०१४ साली राज्यात ४८ निवडली त्यात सातारा जिल्ह्याची ४१ म्हणजे राज्यात ८३%प्रमाण होते.पुढे विकास भुजबळ सरांनी १० वर्ष कसे प्रयत्न केले घरी मुलांचा केलाला सांभाळ मित्रांची मदत जिल्हा विभाग राज्य मेडिकल लोकांचे सहकार्य ,झालेला त्रास १६२ विद्यार्थी निवड होऊनही निकष बदलांनी मंत्रालयात लक्षवेधी प्रश्न बनवण्यास झालेला ध्येयवादी लढा व विजय राज्यास दिलेले धक्के व राज्यभर निर्माण केलेला सातारा जिल्ह्याचा गुणगौरव अशी विजयगाथा ऐकवली. मुलांची निवड पद्धत विविध स्पर्धा व नियोजन याची माहिती दिली . आदरणीय पाटीलसाहेब यांनी याची रोजगारनिर्मितीशी जोड देऊया पोलिसभरती व मिलिट्री भरती मध्ये या मुलांस काय करता येईल का याचा विचार मांडला.स्वावलंबन हेच खरे शिक्षण. मुले स्वताच्या पायावर उभी राहायला शिकावीत.स्वता समस्या सोडवायला शिकावीत.आजारांचा आहाराशी संबध आहे. * योगा आढावा -योगशिक्षक जावळी यांनी सूर्यनमस्कार १०० स्पर्धेत सुवर्ण अक्षराने नाव लिहिलेले प्रमाणपत्र दिले. पाच पांढरी विषे -साखर,मैदा,दुध,मीठ,तांदूळ यांची माहिती दिली म्याडमनी मटकी,मुग,मोड ,शेंगदाणे ,लाडू कुट उकडलेले पदार्थ भाजलेला बटाटा ,फळे १५० रुपयांत सकस आहार कसा बनवतात सांगितले.कच्चे पदार्थ सर्वात उत्तम, .,भाजलेले चांगले.उकडलेले ठीक ,शिजवलेले बरे व तळलेले सर्वात वाईट असे मत मांडले.एका सरांनी सोयाबीन तेल वाईट चायनीज वाईट आहार प्रमाण सांगितले.भात कधी खावा सांगितले.एका सरांनी कुरकुरे शाळा जवळील दुकानातील खाण्याचा परिणाम सांगितला.एका सरांनी दुध पदार्थ सकाळी दही,दुपारी ताक,रात्री दुध योग्य उशः पान पाणी पिण्याची पद्धत्ती व प्रमाण सांगितले.एका शिक्षकांनी बॉबी जाळण्याचा प्रयोग सांगितला.एका सरांनी दीर्घ श्वसनाचे फायदे सांगितले.मुद्रा फायदा सांगितला.कराडच्या म्याडमनी प्राणायामाचे फायदे सांगितले तृण रसाचे फायदे सांगितले एका सरांनी आर्ट ऑफ लिविंग कसे उपक्रम घेते ते सांगितले आदरणीय पाटील साहेबांनी आयुष्यभर उपयोगी ठरेल हे असे शिक्षण द्या गेल्या आठवड्यात विपश्यना करणारे बोलावले तसे आर्ट ऑफ लिविंग चे बोलवा तालुकानिहाय योग समन्वयक नेमायचे आहेत . *तंत्रस्नेही आढावा -महेश लोखंडे सरांनी नंदकुमार साहेबांनी पुणे येथे तंत्रस्नेही कार्यशाळा घेतल्यानंतर पंचायत समिती ब्लॉग तयार करून गुगल फॉर्म द्वारे तंत्रस्नेही निवड केली व आता पंचसूत्री कार्यक्रम सुरु आहे . १) ब्लॉग शाळांचे तयार करणे ब्लॉग तयार करायला शिकविणे २ )शाळांचे apps बनविणे apps बनवायला शिकविणे ३)शैक्षणिक विडीओ तयार करणे तयार करायला शिकविणे ४)software तयार करणे उपलब्ध व वापर करणे ५)whatsapp ग्रुप करून ई लर्निंग देवाण घेवाण करणे tech savvy teachers karad ५०० शिक्षकांचा ग्रुप सुरु आहे बालाजी जाधव यांनी तिसरी व शिष्यवृत्तीचा ऑफलाईन apps तयार केले राज्याच्या टीममध्ये काम करत आहोत आपणास युजर ण बनवता क्रियेटर बनवायचे आहेत असे मत मांडले. राम सालगुडे सरांनी मार्डी केंद्र कसे पेपरलेस केले त्यावरून सरल डाटाबेस संकल्पना माण तालुक्याने महाराष्ट्राला दिलेली आहे राज्याच्या टीममध्ये रिपोर्टवर काम सुरु आहे सांगितले . कराडचे नांगरे सरांनी एकविसाव्या शतकाचा ताणताणाव शाप तर संगणक तंत्रज्ञान वरदान आहे पाटीलसाहेबांचे मायक्रोप्लानिंग आहे क्रीडाशिक्षकांचे ८० दिवस क्रीडाप्रबोधिनी स्पर्धात जातात शाळांचे नुकसान झाले कि मानसिकता राहत नाही तरी त्या काळात बदली शिक्षक मिळावा ही मागणी केली पाटीलसाहेबांनी अहंकार ण ठेवता काम करा मी केले म्हणू नका . आदरणीय शिक्षणाधिकारी गुरव madam यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले आदरणीय मा.श्री नरळेसाहेबांनी संगणक शिक्षकांना शाळांना पुरविण्याची मागणी केली . मा.श्री थाडेसाहेब प्रकल्पसंचालक जि.ग्रा.वी.यं.सातारा जि प,. यांनी जे चांगले आनंददायी ते द्या ३ लाख महिला १५ हजार बचतगट अंगणवाडी सेविका मदतनीस यांना घेऊन आपण आरोग्य शिक्षण स्किल devlopment रोजगार शिष्यवृत्ती असे काम करूया तुम्ही एक्स्पर्ट हिरे आहात . शेवटी आभार मानले व ही जवळ जवळ तीन तास चाललेली मिटिंग संपली

Monday, 3 August 2015
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोडशी
आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोडशी.आज दि.३/८/२०१५ निवडणुकीसाठी आलेने बाहेरुन पाहिली.मन समाधानी झाले.डिजीटल क्लासरुम,बाग,मुलामुलींचे शौचालय,फिल्टरचे पाणी,साउंड सिस्टीम .चौथीची मुले प्रोजेक्टरच्या सहाय्याने अध्ययन करतात स्वतः चालवतात.दानदात्यांच्या याद्या पाहुन लोकसहभाग मोठा आहे हे दिसुन आले.आतुन शाळा पहाता न आल्याचे दुःख आहे.पण बाहेरुनही सर्वांना प्रेरणादायी इथल्या शिक्षक,ग्रामस्थांच्या योगदानाला मानाचा मुजरा.
Sunday, 26 April 2015
तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा
अहमदनगरच्या आजच्या कार्यशाळेचा वृत्तांत
00:05
आज दि.२५.०४.२०१५ रोजी शिर्डी या ठिकाणी जिल्हा परिषद अहमदनगर च्या वतीने मा.शैलेश नवाल साहेब- मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. परिषदेसाठी प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब, शिक्षण आयुक्त मा. भापकर साहेब, शिक्षण संचालक मा. महावीर माने साहेब, विभागीय संचालक मा. रामचंद्र जाधव, उपसंचालक मा. दिनकर टेमकर साहेब, डाएटच्या प्राचार्या मा. ठोके मॅडम, मा. वैशालीताई गेडाम, मा. नामदेव माळी साहेब हे मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ५ शिक्षक, २ केंद्रप्रमुख, सर्व विस्तार अधिकारी व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
परिषदेचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मा. कडूस साहेब यांनी केले. त्यांनी अहमदनगर जील्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. तसेच तंत्रस्नेही शिक्षक चळवळीबाबत जिल्ह्याचे नियोजन सांगितले. जिल्हा १०० % संगणकीकृत असून सर्व शाळांमध्ये ई लर्निंग सुरु करण्यासाठी राज्य तंत्रास्नेही शिक्षकांच्या सहभागातून कृती कार्यक्रम तयार करण्याबाबत माहिती दिली. यावेळी शाळा-केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी-जि.प यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी व पेपरलेस प्रशासनाच्या दृष्टीने पाऊल टाकताना anroid aap चे लाँचिंग मा. सचिव साहेब व आयुक्त साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
परिषदेला संबोधित करताना मा. महावीर माने साहेबांनी सांगितले कि, अधिकाऱ्यांनी शाळा तपासणी करताना शिक्षकांना वेठीस धरून काय नाही हे पाहण्यापेक्षा जे आहे ते पाहावे. तसेच तंत्र शिक्षणाची कास धरून शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करावे.
यावेळी प्रयोगशील शिक्षिका मा. वैशालीताई गेडाम यांनी “मुलांच्या भावविश्वात डोकावताना ” या विषयावर संवाद साधला. मुलांना औपचारिक शिक्षण देण्याऐवजी त्यांना त्यांच्या मनाने व त्यांच्या गतीने शिकू द्यावे, शिक्षकांनी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधावा असे मत त्यांनी मांडले.
मिरजचे गटशिक्षणाधिकारी मा. नामदेव माळी साहेब यांनी “ हसत खेळत शिकू या “ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, शिक्षकांना अधिकाऱ्यांची भीती वाटण्याऐवजी आपुलकी वाटावी. अधिकाऱ्यांनी शाळा भेट देताना विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, मुलांमध्ये जाऊन मिसळावे. कारवाईचा बडगा न दाखवता जे चांगले आहे त्याचे कौतुक करावे. शिक्षकांशी प्रेमाने संवाद साधला, त्यांना सपोर्ट केला तर गुणवत्ता विकास साधता येईल.
राज्य तंत्रस्नेही शिक्षक समन्वय समितीचे व ATF चे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी ATF ची वाटचाल व तंत्रस्नेही शिक्षक गटाची निर्मिती यावर प्रेझेन्टेशन सादर केले. गुणवत्ता विकास साधण्यासाठी ATF च्या माध्यमातून राज्याला दिशादर्शक कार्यक्रम दिला जातो याबाबत त्यांनी माहिती दिली.
यावेळी मा. नवाल साहेब व मा. कडूस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर टेक्नो टीचर्स च्या वतीने तंत्रस्नेही शिक्षक श्री. गणपत दसपुते, एल.पी. नरसाळे, गोरख पावडे, रमजान शेख, मिलिंद जामदार, अशोक पंडित, संतोष दहिवळ, रविंद्र राऊत, संजय तेलोरे यांनी जिल्ह्यासाठी तयार केलेले नियोजन श्री.सुरेश भारती यांनी सादर केले. दि.१८ च्या राज्यस्तरीय बैठकीनंतर जिल्ह्यात दि.२१ रोजी मा.शैलेश नवाल आणि मा.कडूस साहेब यांच्यासमवेत झालेल्या चारची माहिती मा.सचिव नंदकुमार साहेब यांना दिली. त्यानंतर अहमदनगर टेक्नो टीचर्सने जिल्ह्यातील सर्व तंत्रस्नेही लोकांना एका छत्राखाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या http://technoteachers.in/ या वेबसाईट विषयी माहिती दिली. यावर सर्व तंत्रस्नेही लोकांना नाव नोंदणी करण्याची सुविधा ठेवण्यात आलेली असून त्यात सुमारे २८ प्रश्न असल्याची माहिती भारती यांनी दिली. त्यातून तालुकास्तरावर ५ तज्ञ निवडले जाणार असुन ते प्रात्यक्षिक पद्धतीने निवडले जातील असे त्यांनी सांगितले. राज्याच्या धरतीवर प्रत्येक तालुक्यातून २ तंत्रस्नेही लोक जिल्ह्यासाठी घेऊन जिल्हा तंत्र स्नेही गट स्थापन केलेला असून त्यांच्या मदतीने तालुक्यातील तंत्र स्नेही लोक शोधले जातील असे ते म्हणाले. त्यासाठी तालुकास्तरावर तंत्र मेळावे घेतले जाणार आहेत, तसेच श्री.मिलिंद जामदार यांनी टेक्नो साठी तयार केलेल्या https://www.facebook.com/technoteachernagar?fref=ts या फेसबुक पेजची माहिती सांगितली. तीन दिवसात १००+ शिक्षकांनी टेक्नो वर नाव नोंदणी केल्याचे सांगितले. लवकरच जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या पाच तंत्र स्नेही शिक्षकांना दोन दिवसाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती भारती यांनी दिली.
पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मा. दिनकर टेमकर साहेबांनी माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर या विषयी प्रेझेन्टेशन सादर केले. यावेळी त्यांनी गुगल ड्राईव्ह ची उपयोगिता सांगितली.
शिक्षण आयुक्त मा. भापकर साहेब म्हणाले कि शिक्षणात तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराणे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ होते. तंत्र स्नेही शिक्षक चांगले काम करत असून सर्वांच्या प्रयत्नातून गुणवत्ता विकास नक्कीच चांगला होईल.
राज्याचे प्रधान शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेब यांनी आगामी शैक्षणिक वर्षातील गुणवत्ता विकासाबाबत प्रेझेन्टेशन सादर केले. यावेळी त्यांनी वाचन लेखन व इ. ४ थी पर्यंत सर्व प्राथ. गणिती क्रिया सर्व विद्यार्थ्यांना याव्यात हि अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठीचा पूर्ण कार्यक्रम शिक्षकांनी तयार करावा, शिक्षकांना पुरेसा वेळ शिकवण्यासाठी मिळावा म्हणून कोणतेही प्रशिक्षण लादले जाणार नाही, शाळेत येणारे प्रत्येक मुल हे शिकलेच पाहिजे यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांनी इतर शिक्षकांना मदत करावी, वर्गातील हुशार विद्यार्थ्यांनी मागे पडलेल्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत करावी अशा उपाययोजना मांडल्या. अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात विनोदी शैलीने त्यांनी गुणवत्ता विकास कार्यक्रमाची मांडणी केली. यावेळी त्यांनी राज्याला दिशा दर्शक कार्यक्रम सुचविल्या बद्दल तंत्रस्नेही शिक्षक श्री. सुरेश भारती व श्री सचिन कडलग याचा विशाश उल्लेख केला.
तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेच्या निमित्ताने काही तंत्रस्नेही शिक्षकांनी आपल्याकडील उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले. डाएटचे आदिव्याख्याते मा. करवंदे सर यांनी डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मिती मधील डाएटचे योगदान याबाबत सादरीकरण केले. शेवगावच्या विस्तार अधिकारी मा. राऊळ मॅडम यांनी उपक्रमशील शाळांचे सादरीकरण केले. यातून उपस्थित सर्व शिक्षकांना गुणवत्ता विकासात शैक्षणिक तंत्रज्ञानाचे महत्व समजले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निरंतर चे शिक्षणाधिकारी मा. काळे साहेब यांनी केले. यावेळी तंत्रस्नेही शिक्षक श्री. गणपत दसपुते, एल.पी. नरसाळे, गोरख पावडे, रमजान शेख, मिलिंद जामदार, अशोक पंडित, संतोष दहिवळ, रविंद्र राऊत, संजय तेलोरे हे उपस्थित होते.
ऑन लाईन अहवाल
https://www.youtube.com/watch?v=Ba49Dq7Cb98 जिप प्राथ शाळा सुभाषवाड़ी (सारोळा कासार )ता जि अहमदनगर या शाळेतील इ 1ली विद्यार्थी 2 री तील पुस्तके वाचतात इंग्रजी ई लायब्ररी तील पुस्तके वाचताना विद्यार्थी स्वत तंत्रज्ञानाचा वापर करताना व्हडिओ
कार्यशाला शिर्डी मध्ये सादर केलेला व्हिडीओ पहा
http://adarshshala.blogspot.in/p/ebooks.html?m=1
http://www.genee-india.com/interactive-whiteboards/pro-digital-plus-board/Digital board broucher here..
कार्यशाला शिर्डी मध्ये सादर केलेला व्हिडीओ पहा
http://adarshshala.blogspot.in/p/ebooks.html?m=1
अश्या प्रकारे सर्व जिल्हा परिषद् शाळेत सर्व शिक्षक ऑन लाईन अहवाल तयार करू लागले कि पेपर लेस शाला होणार
19:22
अश्या प्रकारे सर्व शिक्षक मानस शास्त्र व् मूल्यमापन व् इतर अध्ययन व् अध्यापनतिल विषय अभ्यास करू लागले की आपल्याला विद्यार्थी मानस शास्त्र वरुण विद्यार्थी गुणवत्ता विकास करता येईल ।
19:25
अश्या प्रकारे आपल्या जिल्हा परिषद् शाळेत सर्व संगणक आले मी विद्यार्थी अपो आप माहिती तंत्र वापर करतील ।
19:27
कृपया वरील लिंक मध्ये पुढील विकास साठी हा आदर्श आहे देत आहे ।
19:29
अश्या प्रकारे सर्वाच सहकार्य मिळाले की सर्व शाला एकत्र होतील ।
19:31
यवतमाळ जिल्ह्यातील जि प ची पहिली डिजीटल शाळा यावली
अहमदनगरच्या आजच्या कार्यशाळेचा वृत्तांत
00:05
आज दि.२५.०४.२०१५ रोजी शिर्डी या ठिकाणी जिल्हा परिषद अहमदनगर च्या वतीने मा.शैलेश नवाल साहेब- मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळा आयोजित करण्यात आली. परिषदेसाठी प्रधान सचिव मा. नंदकुमार साहेब, शिक्षण आयुक्त मा. भापकर साहेब, शिक्षण संचालक मा. महावीर माने साहेब, विभागीय संचालक मा. रामचंद्र जाधव, उपसंचालक मा. दिनकर टेमकर साहेब, डाएटच्या प्राचार्या मा. ठोके मॅडम, मा. वैशालीताई गेडाम, मा. नामदेव माळी साहेब हे मान्यवर उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ५ शिक्षक, २ केंद्रप्रमुख, सर्व विस्तार अधिकारी व सर्व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
परिषदेचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी मा. कडूस साहेब यांनी केले. त्यांनी अहमदनगर जील्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेचा आढावा घेतला. तसेच तंत्रस्नेही शिक्षक चळवळीबाबत जिल्ह्याचे नियोजन सांगितले. जिल्हा १०० % संगणकीकृत असून सर्व शाळांमध्ये ई लर्निंग सुरु करण्यासाठी राज्य तंत्रास्नेही शिक्षकांच्या सहभागातून कृती कार्यक्रम तयार करण्याबाबत माहिती दिली. यावेळी शाळा-केंद्रप्रमुख-गटशिक्षणाधिकारी-जि.प यामध्ये समन्वय ठेवण्यासाठी व पेपरलेस प्रशासनाच्या दृष्टीने पाऊल टाकताना anroid aap चे लाँचिंग मा. सचिव साहेब व आयुक्त साहेबांच्या हस्ते करण्यात आले.
परिषदेला संबोधित करताना मा. महावीर माने साहेबांनी सांगितले कि, अधिकाऱ्यांनी शाळा तपासणी करताना शिक्षकांना वेठीस धरून काय नाही हे पाहण्यापेक्षा जे आहे ते पाहावे. तसेच तंत्र शिक्षणाची कास धरून शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहित करावे.
यावेळी प्रयोगशील शिक्षिका मा. वैशालीताई गेडाम यांनी “मुलांच्या भावविश्वात डोकावताना ” या विषयावर संवाद साधला. मुलांना औपचारिक शिक्षण देण्याऐवजी त्यांना त्यांच्या मनाने व त्यांच्या गतीने शिकू द्यावे, शिक्षकांनी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधावा असे मत त्यांनी मांडले.
मिरजचे गटशिक्षणाधिकारी मा. नामदेव माळी साहेब यांनी “ हसत खेळत शिकू या “ या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले कि, शिक्षकांना अधिकाऱ्यांची भीती वाटण्याऐवजी आपुलकी वाटावी. अधिकाऱ्यांनी शाळा भेट देताना विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, मुलांमध्ये जाऊन मिसळावे. कारवाईचा बडगा न दाखवता जे चांगले आहे त्याचे कौतुक करावे. शिक्षकांशी प्रेमाने संवाद साधला, त्यांना सपोर्ट केला तर गुणवत्ता विकास साधता येईल.
राज्य तंत्रस्नेही शिक्षक समन्वय समितीचे व ATF चे संयोजक भाऊसाहेब चासकर यांनी ATF ची वाटचाल व तंत्रस्नेही शिक्षक गटाची निर्मिती यावर प्रेझेन्टेशन सादर केले. गुणवत्ता विकास साधण्यासाठी ATF च्या माध्यमातून राज्याला दिशादर्शक कार्यक्रम दिला जातो याबाबत त्यांनी माहिती दिली.
यावेळी मा. नवाल साहेब व मा. कडूस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर टेक्नो टीचर्स च्या वतीने तंत्रस्नेही शिक्षक श्री. गणपत दसपुते, एल.पी. नरसाळे, गोरख पावडे, रमजान शेख, मिलिंद जामदार, अशोक पंडित, संतोष दहिवळ, रविंद्र राऊत, संजय तेलोरे यांनी जिल्ह्यासाठी तयार केलेले नियोजन श्री.सुरेश भारती यांनी सादर केले. दि.१८ च्या राज्यस्तरीय बैठकीनंतर जिल्ह्यात दि.२१ रोजी मा.शैलेश नवाल आणि मा.कडूस साहेब यांच्यासमवेत झालेल्या चारची माहिती मा.सचिव नंदकुमार साहेब यांना दिली. त्यानंतर अहमदनगर टेक्नो टीचर्सने जिल्ह्यातील सर्व तंत्रस्नेही लोकांना एका छत्राखाली आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या http://technoteachers.in/ या वेबसाईट विषयी माहिती दिली. यावर सर्व तंत्रस्नेही लोकांना नाव नोंदणी करण्याची सुविधा ठेवण्यात आलेली असून त्यात सुमारे २८ प्रश्न असल्याची माहिती भारती यांनी दिली. त्यातून तालुकास्तरावर ५ तज्ञ निवडले जाणार असुन ते प्रात्यक्षिक पद्धतीने निवडले जातील असे त्यांनी सांगितले. राज्याच्या धरतीवर प्रत्येक तालुक्यातून २ तंत्रस्नेही लोक जिल्ह्यासाठी घेऊन जिल्हा तंत्र स्नेही गट स्थापन केलेला असून त्यांच्या मदतीने तालुक्यातील तंत्र स्नेही लोक शोधले जातील असे ते म्हणाले. त्यासाठी तालुकास्तरावर तंत्र मेळावे घेतले जाणार आहेत, तसेच श्री.मिलिंद जामदार यांनी टेक्नो साठी तयार केलेल्या https://www.facebook.com/technoteachernagar?fref=ts या फेसबुक पेजची माहिती सांगितली. तीन दिवसात १००+ शिक्षकांनी टेक्नो वर नाव नोंदणी केल्याचे सांगितले. लवकरच जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुक्यातून निवडलेल्या पाच तंत्र स्नेही शिक्षकांना दोन दिवसाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती भारती यांनी दिली.
पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक मा. दिनकर टेमकर साहेबांनी माहिती तंत्रज्ञानाचा शिक्षणात वापर या विषयी प्रेझेन्टेशन सादर केले. यावेळी त्यांनी गुगल ड्राईव्ह ची उपयोगिता सांगितली.
शिक्षण आयुक्त मा. भापकर साहेब म्हणाले कि शिक्षणात तंत्रज्ञानाच्या अधिकाधिक वापराणे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सुलभ होते. तंत्र स्नेही शिक्षक चांगले काम करत असून सर्वांच्या प्रयत्नातून गुणवत्ता विकास नक्कीच चांगला होईल.
राज्याचे प्रधान शिक्षण सचिव मा. नंदकुमार साहेब यांनी आगामी शैक्षणिक वर्षातील गुणवत्ता विकासाबाबत प्रेझेन्टेशन सादर केले. यावेळी त्यांनी वाचन लेखन व इ. ४ थी पर्यंत सर्व प्राथ. गणिती क्रिया सर्व विद्यार्थ्यांना याव्यात हि अपेक्षा व्यक्त केली. त्यासाठीचा पूर्ण कार्यक्रम शिक्षकांनी तयार करावा, शिक्षकांना पुरेसा वेळ शिकवण्यासाठी मिळावा म्हणून कोणतेही प्रशिक्षण लादले जाणार नाही, शाळेत येणारे प्रत्येक मुल हे शिकलेच पाहिजे यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांनी इतर शिक्षकांना मदत करावी, वर्गातील हुशार विद्यार्थ्यांनी मागे पडलेल्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत करावी अशा उपाययोजना मांडल्या. अत्यंत खेळी मेळीच्या वातावरणात विनोदी शैलीने त्यांनी गुणवत्ता विकास कार्यक्रमाची मांडणी केली. यावेळी त्यांनी राज्याला दिशा दर्शक कार्यक्रम सुचविल्या बद्दल तंत्रस्नेही शिक्षक श्री. सुरेश भारती व श्री सचिन कडलग याचा विशाश उल्लेख केला.
तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेच्या निमित्ताने काही तंत्रस्नेही शिक्षकांनी आपल्याकडील उपक्रमांचे प्रभावी सादरीकरण केले. डाएटचे आदिव्याख्याते मा. करवंदे सर यांनी डिजिटल शैक्षणिक साहित्य निर्मिती मधील डाएटचे योगदान याबाबत सादरीकरण केले. शेवगावच्या विस्तार अधिकारी मा. राऊळ मॅडम यांनी उपक्रमशील शाळांचे सादरीकरण केले. यातून उपस्थित सर्व शिक्षकांना गुणवत्ता विकासात शैक्षणिक तंत्रज्ञानाचे महत्व समजले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निरंतर चे शिक्षणाधिकारी मा. काळे साहेब यांनी केले. यावेळी तंत्रस्नेही शिक्षक श्री. गणपत दसपुते, एल.पी. नरसाळे, गोरख पावडे, रमजान शेख, मिलिंद जामदार, अशोक पंडित, संतोष दहिवळ, रविंद्र राऊत, संजय तेलोरे हे उपस्थित होते.
नांदेड येथे जिल्हास्तरीय ई-लर्निंग कार्यशाळा
हदगाव तालुक्यातील शाळा तंत्रस्नेही होणार'
बाळासाहेब राजे
आज दि.25 एप्रिल 2015 शनिवार रोजी जिल्हा परिषद हायस्कुल हदगाव, जि. नांदेड येथे जिल्हास्तरीय ई-लर्निंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पष्टेपाडा, ता. शहापूर, जि. ठाणे येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. संदिप गुंड सर प्रमुख मार्गदर्शक होते. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रतिनिधींना व हदगाव तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी गुंड सरांच्या सोबत मा.केंद्रप्रमुख महेंद्र धिमते सर उपस्थित होते.
सकाळी ठीक अकरा वाजता हदगाव तालुक्याचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी मा. श्री. येरपुलवार साहेब, श्री. संदिप गुंड सर व केंद्रप्रमुख श्री. महेंद्र धिमते सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्री. महेंद्र धिमते सर यांनी ई- लर्निंग शाळेचा परिचय करुन दिला. यानंतर मा.श्री. नंदकुमार साहेब, शिक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी भ्रमणध्वनीवरून हदगाव तालुक्याचे मा. गटशिक्षणाधिकारी श्री. येरपुलवार साहेब व कार्यशाळेस उपस्थित 230 शिक्षकांशी संवाद साधला. मा. नंदकुमार साहेबांनी श्री. संदिप गुंड सर यांचे मनःपूर्वक कौतुक केले व हदगाव तालुक्यातील शिक्षकांना डिजीटल शाळा उभारण्याच्या कामाकरिता शुभेच्छा दिल्या.
साधारण पावणे बारा वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत श्री.संदिप गुंड सरांनी उपस्थित शिक्षकांना अनमोल मार्गदर्शन केले. एका आदिवासी पाड्यावरील दूर्लक्षित शाळेपासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. या पावणेचार तासातील त्यांच्या सादरीकरणावरून लक्षात आले की, हा प्रवास सहजासहजी झालेला नाही, यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. गुंड सरांनी तंत्रस्नेही शाळा काळाची गरज, तंत्रस्नेही शाळेसाठी आवश्यक संसाधने, त्यांच्या किमती, उपलब्धता व वापर याविषयी सखोल माहिती दिली. शाळाबाह्य असणा-या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी टॅबलेटचा कल्पकतेने वापर केला. हातावर पोट असणा-या पाड्यावरील लोकांमध्ये मिसळून त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. जागरूक झालेल्या पालकांनी शाळेला यथाशक्ती मदत केली. शाळेत प्रोजेक्टर आला, शाळा तंत्रस्नेही झाली, विद्यार्थी आवडीने शाळेत यायला लागले, कृतीआधारित अध्ययन-अध्यापन होऊ लागले, मुलांची गुणवत्ता वाढली. सुरुवातीला अवघड वाटणारा ज्ञानरचनेचा प्रवास गुंड सरांच्या प्रयत्नामुळे, श्री.धिमते सर व श्री. डोंगरे सरांच्या प्रोत्साहनामुळे आणि लोकसहभागामुळे समृद्ध होत गेला आणि शाळेने चक्क राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली गाठले. शाळा आज सर्व आधुनिक माहिती व तंत्रज्ञान साधनांनी सुसज्ज असून गुंड सरांचे विद्यार्थी पुस्तकाशिवाय टॅब, लॅपटॉप, डिजीटल बोर्डचा वापर करून स्वतःच कृतीआधारित शिक्षण घेतात. पष्टेपाडा शाळा आज अख्ख्या महाराष्ट्रातील शिक्षकांची प्रेरणा बनली आहे. या प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहेत श्री. गुंड सर!
श्री. गुंड सरांनी power point presentation द्वारे तंत्रस्नेही शाळेविषयी उत्तम मार्गदर्शन केले. सर म्हणाले की," आपण गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले की, लोकसहभाग आपोआप वाढतो." श्री.गुंड सरांच्या कार्याचे कौतुक करावे; तेवढे कमीचं आहे. ते स्वतःच्या शाळेचा विकास करून थांबले नाहीत; तर महाराष्ट्रभर डिजीटल शाळांची उभारणी व्हावी म्हणून ठिकठिकाणी कार्यशाळा घेत आहेत. शिक्षक बंधूभगिनींना प्रेरणा देत आहेत, त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत. 'कोणतेही काम मनापासून केले की; ते उत्कृष्ट होते. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही; अन् वेडी माणसेच इतिहास घडवितात. असामान्य माणसे मळलेली वाट सोडून; स्वतःच स्वतःसाठी नवीन मार्ग शोधतात.' याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री. गुंड सर व त्यांची टीम!
ई-लर्निंग कार्यशाळा शनिवारी म्हणजेच अर्ध्या सुट्टीच्या दिवशी आयोजित केलेली असूनही हदगाव तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व उपक्रमशील शिक्षक स्वतःहून उत्साहाने या कार्यशाळेस उपस्थित होते. श्री.संदिप गुंड व श्री. महेंद्र धिमते सरांच्या अतुलनीय कार्यामुळे हदगाव तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना निश्चितपणे प्रेरणा मिळाली असून येत्या काही दिवसांत आमच्याही शाळा डिजीटल होतील, यात शंका नाही.
श्री. गुंड सरांच्या सादरीकरणानंतर नांदेड जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आम्ही लवकरच डिजीटल शाळा उभ्या करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही कार्यशाळा आयोजित व यशस्वी करण्यात पंचायत समिती हदगावचे मा.गटशिक्षणाधिकारी श्री.येरपुलवार साहेब व मा. शिक्षणविस्तार अधिकारी श्री. बाच्छे साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे.
तिरपी रेघ :- या जगातील काही माणसे मुळातचं वेडी असतात.
सरळ रेघ :- वेडी माणसेच इतिहास घडवतात.
तुम्हाला वेडं व्हायला आवडेल का?
जाताजाता :- मी 8वीत असताना आमच्या पोतदार सरांनी आम्हाला समाजसुधारकांचे दोन प्रकार शिकविले होते. पहिला प्रकार- बोलते सुधारक, जे फक्त बडबड करतात. प्रत्यक्षात काहीच करत नाहीत. दुसरा प्रकार- कर्ते सुधारक - जे आपल्या कामातूनच आदर्शांची उभारणी करतात.कार्यशाळेचे सन्माननीय आयोजक व मार्गदर्शक दुस-या प्रकारातील आहेत.
आज दि.25 एप्रिल 2015 शनिवार रोजी जिल्हा परिषद हायस्कुल हदगाव, जि. नांदेड येथे जिल्हास्तरीय ई-लर्निंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पष्टेपाडा, ता. शहापूर, जि. ठाणे येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. संदिप गुंड सर प्रमुख मार्गदर्शक होते. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रतिनिधींना व हदगाव तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी गुंड सरांच्या सोबत मा.केंद्रप्रमुख महेंद्र धिमते सर उपस्थित होते.
सकाळी ठीक अकरा वाजता हदगाव तालुक्याचे उपक्रमशील गटशिक्षणाधिकारी मा. श्री. येरपुलवार साहेब, श्री. संदिप गुंड सर व केंद्रप्रमुख श्री. महेंद्र धिमते सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्री. महेंद्र धिमते सर यांनी ई- लर्निंग शाळेचा परिचय करुन दिला. यानंतर मा.श्री. नंदकुमार साहेब, शिक्षण सचिव, महाराष्ट्र राज्य यांनी भ्रमणध्वनीवरून हदगाव तालुक्याचे मा. गटशिक्षणाधिकारी श्री. येरपुलवार साहेब व कार्यशाळेस उपस्थित 230 शिक्षकांशी संवाद साधला. मा. नंदकुमार साहेबांनी श्री. संदिप गुंड सर यांचे मनःपूर्वक कौतुक केले व हदगाव तालुक्यातील शिक्षकांना डिजीटल शाळा उभारण्याच्या कामाकरिता शुभेच्छा दिल्या.
साधारण पावणे बारा वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत श्री.संदिप गुंड सरांनी उपस्थित शिक्षकांना अनमोल मार्गदर्शन केले. एका आदिवासी पाड्यावरील दूर्लक्षित शाळेपासून राष्ट्रपती भवनापर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. या पावणेचार तासातील त्यांच्या सादरीकरणावरून लक्षात आले की, हा प्रवास सहजासहजी झालेला नाही, यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. गुंड सरांनी तंत्रस्नेही शाळा काळाची गरज, तंत्रस्नेही शाळेसाठी आवश्यक संसाधने, त्यांच्या किमती, उपलब्धता व वापर याविषयी सखोल माहिती दिली. शाळाबाह्य असणा-या मुलांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी टॅबलेटचा कल्पकतेने वापर केला. हातावर पोट असणा-या पाड्यावरील लोकांमध्ये मिसळून त्यांना शिक्षणाचे महत्व पटवून दिले. जागरूक झालेल्या पालकांनी शाळेला यथाशक्ती मदत केली. शाळेत प्रोजेक्टर आला, शाळा तंत्रस्नेही झाली, विद्यार्थी आवडीने शाळेत यायला लागले, कृतीआधारित अध्ययन-अध्यापन होऊ लागले, मुलांची गुणवत्ता वाढली. सुरुवातीला अवघड वाटणारा ज्ञानरचनेचा प्रवास गुंड सरांच्या प्रयत्नामुळे, श्री.धिमते सर व श्री. डोंगरे सरांच्या प्रोत्साहनामुळे आणि लोकसहभागामुळे समृद्ध होत गेला आणि शाळेने चक्क राष्ट्रपती भवन, नवी दिल्ली गाठले. शाळा आज सर्व आधुनिक माहिती व तंत्रज्ञान साधनांनी सुसज्ज असून गुंड सरांचे विद्यार्थी पुस्तकाशिवाय टॅब, लॅपटॉप, डिजीटल बोर्डचा वापर करून स्वतःच कृतीआधारित शिक्षण घेतात. पष्टेपाडा शाळा आज अख्ख्या महाराष्ट्रातील शिक्षकांची प्रेरणा बनली आहे. या प्रेरणेचा अखंड स्त्रोत आहेत श्री. गुंड सर!
श्री. गुंड सरांनी power point presentation द्वारे तंत्रस्नेही शाळेविषयी उत्तम मार्गदर्शन केले. सर म्हणाले की," आपण गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले की, लोकसहभाग आपोआप वाढतो." श्री.गुंड सरांच्या कार्याचे कौतुक करावे; तेवढे कमीचं आहे. ते स्वतःच्या शाळेचा विकास करून थांबले नाहीत; तर महाराष्ट्रभर डिजीटल शाळांची उभारणी व्हावी म्हणून ठिकठिकाणी कार्यशाळा घेत आहेत. शिक्षक बंधूभगिनींना प्रेरणा देत आहेत, त्यांच्या समस्यांचे निराकरण करत आहेत. 'कोणतेही काम मनापासून केले की; ते उत्कृष्ट होते. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही; अन् वेडी माणसेच इतिहास घडवितात. असामान्य माणसे मळलेली वाट सोडून; स्वतःच स्वतःसाठी नवीन मार्ग शोधतात.' याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री. गुंड सर व त्यांची टीम!
ई-लर्निंग कार्यशाळा शनिवारी म्हणजेच अर्ध्या सुट्टीच्या दिवशी आयोजित केलेली असूनही हदगाव तालुक्यातील सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व उपक्रमशील शिक्षक स्वतःहून उत्साहाने या कार्यशाळेस उपस्थित होते. श्री.संदिप गुंड व श्री. महेंद्र धिमते सरांच्या अतुलनीय कार्यामुळे हदगाव तालुक्यातील व नांदेड जिल्ह्यातील शिक्षकांना निश्चितपणे प्रेरणा मिळाली असून येत्या काही दिवसांत आमच्याही शाळा डिजीटल होतील, यात शंका नाही.
श्री. गुंड सरांच्या सादरीकरणानंतर नांदेड जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आम्ही लवकरच डिजीटल शाळा उभ्या करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ही कार्यशाळा आयोजित व यशस्वी करण्यात पंचायत समिती हदगावचे मा.गटशिक्षणाधिकारी श्री.येरपुलवार साहेब व मा. शिक्षणविस्तार अधिकारी श्री. बाच्छे साहेब यांचा सिंहाचा वाटा आहे.
तुम्हाला वेडं व्हायला आवडेल का?
Subscribe to:
Posts (Atom)