मैत्री मतिमंद मुली व महिला समवेत सॅनिटरी नॅपकिन
पुरविण्याची नाविन्यपूर्ण योजना
प्रस्तावना
जिल्हा परिषद सातारा, एकात्मिक बाल विकास सेवा
योजना, जिल्हा कक्ष व सातारा जिल्हा केंमिस्ट
असोसिएशन, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा
जिल्ह्यात मतिमंद मुली व महिला यांना सॅनिटरी नॅपकिनचा
वाटप करणेचा नाविन्यपूर्ण उपक्रमास २ आक्टोंबर 2015 पासून
सुरुवात झालेली आहे. या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हयातील
११ ते ५० वयोगटातील मतिमंद मुली व महिलांना दरमहा
सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा करण्यात येणार आहे.
पार्श्वभूमी
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत कार्यरत असणा-
या पर्य़वेक्षिका व अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून
सातारा जिल्ह्यातील मतिमंद मुली व महिलांचे सर्वेक्षण
करण्यात आले. या सर्वेक्षणामधे सातारा जिल्ह्यात १२२९
मतिमंद मुली व महिला आढळून आल्या. या मुली व महिलांना
दरमहा मासिक पाळीच्या वेळी होणा-या रक्तस्त्रावामुळे
त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. या काळात आवश्य ती
स्वच्छता राखली जावी व आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
टाळावेत यासाठी या मुली व महिलांना सॅनिटरी
नॅपकिन्सचा वाटप करणेची योजना आखणेत आली. मा. अप्पर
आयुक्त, पुणे विभाग, पुणे श्री. श्याम देशपांडे, यांच्या प्रेरणेतून
तसेच सातारा जि.प. अध्यक्ष मा.श्री. माणिकराव
सोनवलकर, सातारा जिल्हाधिकारी मा. श्री. अश्विन
मुद्गल व सातारा जि.प. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री. नितीन पाटील, यांच्या मार्गदर्शनातून व उप मुख्य
कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री. जावेद शेख यांच्या
प्रयत्नातून या योजनेस सुरुवात करण्यात आली.
योजनेचे स्वरुप
या योजने अंतर्गत दरमहा ५ तारखेपर्यंत तालुका स्तरावर
सॅनिटरी नॅपकिन्सचा पुरवठा केमिस्ट असोसिएशन मार्फत
करण्यात येणार असून त्याच महिन्याच्या १० तारखेपर्यंत बाल
विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका व अंगणवाडी
सेविका यांच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पुरवठा
करण्यात येणार आहे.
ज्या गरजू व पात्र लाभार्थीपर्यंत ही योजना अजून पोहचली
नसेल अशा लाभार्थ्यांनी अथवा त्यांच्या पालकांनी,
कुटुंबीयांनी तालुका स्तरावरील एकात्मिक बाल विकास
सेवा योजना कार्यालयाशी संपर्क साधावा व योजनेचा लाभ
मिळवुन घ्यावा असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य
कार्यकारी अधिकारी मा. श्री. नितीन पाटील, यांनी केले
आहे.
तालुका स्तरावरील एकात्मिक बाल विकास सेवा योजना
कार्यालय तेथील संबधित अधिकारी व कार्यालयाचे
दुरध्वनी क्रमांक.
सातारा जिल्ह्यात मतिमंद मुली व महिला यांना सॅनिटरी
नॅपकिनचे वाटप करणेचा नाविन्यपूर्ण उपक्रमास सुरुवात दि. 2
आक्टोंबर 2015 गांधी जयंतीपासुन करणेत आली. या
कार्यक्रमात मा. अध्यक्ष, श्री. माणिकराव सोनवलकर यांनी
मार्गदर्शन केले. तसेच मा. अध्यक्ष श्री. माणिकराव सोनवलकर
मा. श्री. नितीन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, मा.
श्री. अमित कदम, सभापती, शिक्षण व अर्थ समिती, जि.प.
सातारा, मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री.
जावेद शेख, सातारा केमीस्ट व ड्रगिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष
श्री. पाटील व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते. त्यांचे
शुभहस्ते मतिमंद मुली व महिला यांना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप
करणेत आले.
Tuesday, 22 December 2015
मैत्री:सातारा जिल्हा परिषदेचा नाविण्यपुर्ण उपक्रम
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment